अशी विवंचना ठाई.
कणा नाममात्र जसा,
प्रश्न भुकेचाच राही.
येथे लाथाडले जाती,
आत्मसन्मानाचे ढीग.
अहंकाराचा प्रकोप,
येई रोजचा उबग.
ज्याच्या हाती धागेदोरे,
तोच मिजास मिरवी.
इतरांनी लाचारीने,
गावी भेसूर थोरवी.
अशी मुजोरी बघावी,
गपगुमाने निमूट.
अनंताचाही होतसे,
भुकेभोवती शेवट.